रुजल जोशीला ‘साऊथ एशियन युथ गेम्स २०२३’ मध्ये ‘सिल्वर मेडल’


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्रीलंकेतील कोलंबो येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ८ ते १२ वयोगटातील ‘साऊथ एशियन युथ गेम्स २०२३’ योगा स्पर्धेमध्ये कु. रुजल नचिकेत जोशी (वय ९) हिने जागतिक स्तरावर ‘सिल्वर मेडल’ मिळवले आहे. त्याबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सध्या रुजल ही ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, निगडी येथे शिकत असून या स्कूलमधील अभिश्री रजपूत यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. फलटण येथील सौ. वंदना जोशी व श्री. नंदकुमार जोशी यांची ती नात आहे.


Back to top button
Don`t copy text!