
स्थैर्य, फलटण, दि. २९ : फलटण शहर व तालुक्यातील गोरगरिबांसाठीची घरगुती वीजबिल व पाणीपट्टी कर आकारणी माफ करावी अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर (आरपीआय ए) चे तालुकाध्यक्ष संजय म. गायकवाड व शहराध्यक्ष महादेव रा. गायकवाड यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
सदर मागणी मान्य न झाल्यास आंदोनलन करण्याचा इशारा निवेदनात देताना त्यांनी नमूद केले आहे की, कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे गोरगरिबांच्या हाताला काम धंदा नसल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत असल्यामुळे राज्य सरकारने या कोरोना महामारी कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता फलटण शहर व फलटण तालुक्यातील गोरगरिबांचे घरगुती तीन महिन्याचे घरगुती लाईट बिल व घरपट्टी, पानपट्टीचा कर राज्य सरकारने त्वरित माफ करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर माननीय दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष व सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय ए तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, फलटण शहर अध्यक्ष महादेव गायकवाड यांनी महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.