स्थैर्य, फलटण, दि.२५: कार्तिक शुद्ध त्रयोदशी अर्थात श्रीगोरक्षनाथ महाराज प्रकटदिनी दि.28 पासून आध्यात्मक्षेत्रातील जाणकार चैतन्य प्रेम यांच्याशी ‘श्री दत्त संप्रदाय’ या विषयावर झालेल्या चर्चेचे ऑडियो ‘सत्संगाश्रय’ या उपक्रमांतर्गत इंटरनेटवर भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा अनोखा उपक्रम रोहन विजय उपळेकर करणार आहेत.
फलटण तालुक्यात 59 जणांना कोरोनाची बाधा
याविषयी माहिती देताना रोहन उपळेकर यांनी सांगितले की, ‘‘‘सत्संगाश्रय’ या उपक्रमासाठी ही चर्चा झालेली आहे. चैतन्य प्रेम यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी श्रीसद्गुरुकृपेने उत्तरे देण्याचा या चर्चेदरम्यान प्रयत्न केला आहे. ’सत्संगाश्रय’च्या गुगल ड्राइव्ह लिंकवर असे असंख्य ध्वनिसंदेश आहेत. त्यांच्या होमपेजवर गेल्यावर संबंधित फोटोवर क्लिक केले की ऑडियो फोल्डर ओपन होते. त्यातील ऑडियो मग डाऊनलेड करून ऐकता येतात. शनिवार दि.28 पासून ’श्रीदत्तसंप्रदाय’ या नावाच्या फोल्डरमधील माझे ऑडियो आपल्याला ऐकता येतील. ही माहितीपूर्ण चर्चा श्रोत्यांना आनंद व लाभदायक ठरेल अशी आशा करतो. मी पहिल्यांदाच या ऑडियो माध्यमातून आपल्याला भेटत आहे, तेव्हा मोठ्या मनाने मला सांभाळून घ्यावे ही विनंती. यात आपल्याला काही सुधारणा आवश्यक वाटत असतील तर त्यासाठी सूचना जरूर सांगाव्यात, त्यांचे स्वागतच आहे.’’
सत्संगाश्रय लिंक –
https://sites.google.com/view/