सोनगाव कचरा डेपो जवळ रॉकेट ट्रक पलटी; सुदैवाने जिवितहानी नाही; ट्रकचे मात्र नुकसान


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । सातारा । शेंद्रे ते सातारा बोगदा मार्गावर आज सकाळी एक रॉकेट ट्रक ओढ्यात पलटी झाला. या अपघातात जिवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. शेंद्रे मार्गावर होणारी वाहतूक ट्रक पलटल्याने थंडावली होती . हा ट्रक जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू होते .

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी शेंद्रे ते सातारा बोगदा मार्गावर पवनचक्कीचे सामान एक रॉकेट ट्रक घेवून जात होता. हा रस्ता अरुंद असल्यान शिवशाही हॉटेल जवळ ट्रक चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला आणि ट्रक ओढ्यात पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून ओढ्यातून ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.


Back to top button
Don`t copy text!