
दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। सातारा। माण तालुक्याच्या बहुतांश भागात रविवारी धुवाधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दहिवडी-फलटण, शिंगणापूर-फलटण, आंधळी-मलवडी, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी हे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
तसेच शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला रविवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. रविवारी दिवसभर शिंगणापूर तसेच परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे, नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. तर ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.