फलटण शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदारच होतील : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १० : आगामी काही दिवसांमध्ये संपूर्ण फलटण शहरात रस्त्यांची कामे सुरु होणार आहेत. फलटण शहरामध्ये भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची कामे हि स्थगित करण्यात आलेली होती. परंतु आता फलटण शहरामध्ये ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले आहे त्या ठिकाणी आता रस्त्यांची कामे सुद्धा काही दिवसात सुरु होतील व हि सर्व कामे हि दर्जेदार होतील अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिली.

फलटण येथील प्रभाग नं. ११ मधील पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याकरिता फलटण नगर परिषदेच्या विशेष रस्ता अनुदानाच्या माध्यमातून एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या निधी अंतगत येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे, सौ. मधुबाला भोसले, सौ. प्रगती कापसे, सौ. वैशाली चोरमले, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अजय माळवे, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले, राहुल निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सध्या फलटण शहरामध्ये भुयारी गटार योजनेची कामे सुरु आहेत. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होतील त्या ठिकाणी तातडीने रस्त्याची कामे सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या मुळे येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण फलटण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेची कामे झालेली आहेत. त्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी दिली.

विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहराचा कायापालट होत आहे. फलटण शहरामध्ये विविध विकासकामे हि सुरु असून आगामी काही वर्षांमध्ये फलटण शहर हि एक मॉडेल सिटी होईल. फलटण शहरामध्ये सुरु असणारी रस्त्यांची कामे हि उत्कृष्ठ दर्जाची होतील असा विश्वास या वेळी नगरसेविका सौ. मधुबाला भोसले यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!