भात खाचरामध्ये रस्त्याचे पाणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना

 

स्थैर्य, पांचगणी, दि. 06 : विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चार पदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून नाले न काढल्यामुळे रस्त्याचे पाणी लगतच्या शेतात जात असल्याने शेतकयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील शेतकयांना बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकयांना मनस्ताप देणाया ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

विटा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम जावळी तालुक्यात मेढा, केळघर, व केळघर घाट या परिसरात वेगाने सुरू आहे. हे काम करत असताना बहुतांशी ठिकाणी मोया तसेच रस्त्याची उंची वाढवल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाले न काढल्याने  रस्त्यालगत असणाया भात खाचरामध्ये रस्त्याचे पाणी घुसत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने ही खाचरे पाण्याने तुंबलेल्या  अवस्थेत आहे. खाचरातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने काही ठिकाणी भात खाचरांच्या ताली पडलेल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!