
स्थैर्य, सातारा, दि. 20 सप्टेंबर : शहरातील राजवाडा परिसरात सुरू केलेल्या गटार आणि रस्ता बांधणीच्या कामामुळे हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहन चालकांची मोठी कोंडी झाली. मोती चौकात बॅरिकेड उभारून हा रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळे आता कुठून बाहेर पडायची आणि कसे वळायचे याबाबत कोणतेही मार्गदर्शन करणारे फलक नसल्यामुळे गोल बाल परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत होते. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)