सुशांत मृत्यू प्रकरण:एनसीबीकडून रियाची 6 तास चौकशी, रियाला उद्या परत चौकशीसाठी बोलवले


 

स्थैर्य, मुंबई, दि.६: सुशांत सिंह राजपूत मृत्यूसंबंधित ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) आज रिया चक्रवर्तीची 6 तास चौकशी केली. रिया दुपारी 12 वाजता एनसीबीच्या कार्यालयात आली होती. एनसीबी उद्याही रियाची चौकसी करणार आहे. एनसीबीने सकाळी रियाच्या घरी जाऊन समन्स बजावला होता. ड्रग्स केसमध्ये आतापर्यंत सुशांतचा हेल्पर दिपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शोविक चक्रवर्ती (रियाचा भाऊ), सॅमुअल मिरांडा आणि अब्बास लखानीला ताब्यात घेतले आहे. कैजान इब्राहिमलाही अटक झाली होती, पण शनिवारी त्याला जामीन दिला.

रियाचे वकील म्हणाले- प्रेम करणे गुन्हा असेल, तर रिया शिक्षा भोगण्यास तयार

रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, ‘रिया अटक होण्यासाठी तयार आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे गुन्हा असेल, तर रिया शिक्षा भोगण्यास तयार आहे. ती निर्दोष आहे, त्यामुळेच तिने बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबीचा सामना केला. ‘

सुशांतच्या फ्लॅटवर पुन्हा केले घटनेचे नाट्य रूपांतर

सीबीआय टीमने शनिवारी एम्सच्या डाॅक्टरांसोबत सकाळी सुशांतच्या वांद्र्यातील फ्लॅटवर जाऊन तपास केला. तेथे दीड तास फ्लॅटची व्हिडिओग्राफी करण्यात आली. वृत्तांनुसार, सीबीआय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा क्राइम सीनचे नाट्य रूपांतर केले. सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मीतू सिंह, कुक नीरज व केशव, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी हेही होते. दरम्यान, मुंबई पोलिस सीबीआयला तपासात सहकार्य करत असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!