यूएस क्रूड स्टॉक्समधील तेजी आणि इराणी तेलाच्या पुनरुज्जीवनामुळे बाजारपेठेत तेलाची पिछेहाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई |  गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूड ०.२ टक्क्यांनी गडगडून ८२.८ डॉलर्स प्रतिबॅरलवर बंद झाले. या व्यवहारांदरम्यान तेलाचे दर कमीच स्तरावर राहण्याची शक्यता आहे. कारण की, एकीकडे अमेरिकेच्या तेलसाठ्यात वाढ होत आहे, तर दुसरीकडे या जागतिक महासत्तेने आण्विक कार्यक्रमांबाबत इराणशी चर्चा पुन्हा सुरू केल्याने बाजारातील भावनांवर दबाव आला असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेच्या ऊर्जा विभाग प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २२ ऑक्टोबर २०२१ ला संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तेलसाठ्यात ४.३ दशलक्ष बॅरल्सची वाढ करण्यात आली आहे. ती बाजाराच्या १.९ दशलक्ष बॅरल्सची वाढ होण्याच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त ठरली. तथापि, जागतिक मागणीत वाढ होत असताना पुरवठा घटण्याच्या संभाव्य चिंतामुळे तेलाच्या साप्ताहिक किंमतींत वाढ झाली. यामुळे बाजाराच्या धारणेला आणखीच बळ मिळाले. तेलाची जागतिक बाजारपेठ तणावात असतानाही ओपेक आणि त्यांच्या सहकारी संस्था तेल उत्पादनात वाढ करण्याच्या आपल्या पूर्वनिर्धारित निर्णयावर ठाम आहेत. यामुळे तेलाच्या किमतींना आणखीच मदत मिळाली आहे.

चीनमध्ये सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोळसा आणि विजेच्या किमती घटल्या आहेत. मात्र, घसरत्या तापमानामुळे इंधनाची मागणी वाढणार असल्याच्या अपेक्षमुळे उर्वरित जगासाठी कोळसा व विजेच्या किमती चढ्याच राहणार आहेत. एकीकडे अमेरिकेच्या क्रूड तेलसाठ्यात वाढ होत असताना जागतिक बाजारपेठेत इराणकडूनही पुरवठा पूर्ववत होण्याच्या चिंतेमुळे ऑगस्ट २०२१ नंतर तेल व्यापारात प्रथमच साप्ताहिक तोटा नोंदवण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!