स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२५: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला आता केवळ एक दिवस उरला आहे. शुक्रवारी खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, या सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात ऋषभ पंत आणि ऋद्धिमान साहा हे प्रमुख यष्टिरक्षक आहेत. आता यापैकी कुणाला संधी द्यावी, याबाबत भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने आपले मत प्रदर्शित केले आहे.
पीटीआयशी संवाद साधताना गांगुलीने सांगितले की, सध्या भारतीय संघाकडे ऋषभ पंत आणि ऋद्धिमान साहा यांच्या रुपात दोन दर्जेदार यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जो चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे, असे सौरव गांगुलीने सांगितले.
जिल्ह्यात 957 गावांच्या गावठाणांची होणार मोजणी; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळणार ‘मालकी हक्क’
सौरव गांगुलीच्या विधानाचा विचार केल्यास भारतीय संघ पहिल्या वनडेसाठी ऋद्धिमान साहाला संघात स्थान देऊ शकतो. साहाने नुकत्याच आटोपलेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. तर पंतला अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नव्हती. त्याने १४ सामन्यात ३१.१८ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या होत्या. तसेच पंतचा स्ट्राइकरेटसुद्धा ११३.९५ एवढाच राहिला होता. उलट ऋद्धिमान साहाने केवळ ४ सामने खेळताना ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा कुटल्या होत्या. तर त्याचा स्ट्राईकरेटसुद्धा १४० च्या वर होता. एवढेच नाही तर यष्टिरक्षणामध्येदेखील साहाची कामगिरी ही ऋषभ पंतपेक्षा उजवी झाली होती.
दुसरीकडे ऋषभ पंतचा ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या पंतने चार सामन्यांत ५८.३३ च्या सरासरीने ३५० धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश होता. आता संघव्यवस्थापन पंतचा रेकॉर्ड पाहते की साहाच्या फॉर्मचा विचार करते हे पाहावे लागेल.
वाढेफाट्यानजिक चाकूचा धाक दाखवून रोकड लुटलीदोन युवकांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात