चुकीची कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोकू – रिपाईचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहळ यांचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा नगरपालिकेचे सर्वेसर्वा छ. उदयनराजे भोसले हे कधी कुणाचे अतिक्रमण काढण्यास सांगत नाही. नगरपालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी चुकीचे वागत आहे. दोन पैसे मिळविण्यासाठी गरिब व्यावसायिकांना नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण हटविण्यासाठी सांगण्याचे प्रकार सुरू आहेत. अतिक्रमण काढायचे असतील तर शहरातील सरसकट सर्व काढावीत. मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठोकून काढू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांनी दिला.

सातारा शहरात मनाली हॉटेलच्या समोर असणारी अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेचे पदाधिकारी आले होते. तेव्हा अतिक्रमण करणाऱ्या लोकांना नगरपालिकेचे अधिकारी यांनी सूचना देऊन फळविक्रेते आणि चप्पल विक्रेते यांना व्यवसाय बंद करण्यास सांगितले. पण स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक व होकर संघटनेचे अध्यक्ष तेथे पोचल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पळता पाय काढला. त्यानंतर स्थानिक लोकांना तेथे पुन्हा आपले गाडा आणि दुकाने सुरू करण्यास सांगितले.

सातारा शहरात ठराविक लोकांचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पदाधिकारी यांनी मध्यस्थी करताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना माघार घ्यावी लागला. त्यामुळे आता यावर अतिक्रमणे निघणार की नाही याची चर्चा सातारा शहरात सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!