बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातूनच रिक्षा चालकांची प्रवासी वाहतूक…


स्थैर्य, सातारा, दि. 25 डिसेंबर : सातारा मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातच रिक्षाचालक मनमानी कारभार करत उभे राहून बसमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांना बिनधास्त त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आकारलेल्या भाडे दरात इच्छुक स्थळी पोहचवत आहेत. त्यामुळे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सध्या आगमन आणि निर्गमन दाराचे ठिकाणी रखवालदार नेमून अशा गैरवाहतुकीला आळा घातला तरच, बेकायदेशीर वाहतूक बंद होऊन एक नीटनेटकेपणा आणि सुसूत्रपणा येऊन बसस्थानक परिसरातील प्रवाशांना होणारी अडचण टळेल हीच अपेक्षा सामान्य प्रवाशांकडून होत आहे. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!