स्थैर्य, दि.१५: माजी मिस वर्ल्ड, अभिनेत्री मानुषी छिल्लरला यावर्षीची मिस इंडिया रनर-अप मान्या सिंगचा अभिमान वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील ऑटो चालकाची मुलगी मान्याला मिस इंडिया स्पर्धेच्या सोहळ्यात मुकुट घातल्यानंतर मानुषी व इतर काही सेलेब्सनी आनंद व्यक्त केला आहे. मान्याच्या विजयावर मानुषीने सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत तिच्या संघर्षाला सलाम केला आहे. अभिनेता वरुण धवनने देखील या पोस्टला लाइक केले आहे.
मान्याने सांगितला तिचा संघर्ष
मान्याने आयुष्यातील संघर्षाविषीय सांगताना म्हटले की, “मी अनेक रात्री न खाता आणि जागेपणी घातल्या आहेत आणि अनेल मैल मी पायी चालले आहे. मला हा विजय मिळविण्यासाठी घाम आणि अश्रूंनी प्रोत्साहन वाढवले. रिक्षाचालकाची मुलगी म्हणून मला कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. कारण बालपणीच काम करण्यास सुरुवात केली होती. मी पुस्तकांसाठी तळमळत होते, परंतु नशीबाने माझी साथ दिली नाही.”
वयाच्या 14 व्या घरातून पळून गेली होती मान्या
मान्यने सांगितले की, “अखेरीस, माझ्या पालकांनी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवली. जेणेकरुन मी माझी परीक्षा फी भरून माझी डिग्री मिळवू शकेन. माझ्या आईने माझ्यासाठी खूप त्रास सहन केला. मी 14 वर्षांची असताना घरातून पळून गेले होते. मी दिवसा अभ्यास करायचे, संध्याकाळी भांडे घासायचे आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करत होते. रिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी मी तासनतास पायी चालून माझ्या ठिकाणावर जात होते. आज फेमिना मिस इंडिया 2020 च्या मंचावर सांगू इच्छिते की, जर तुम्ही तुमचे स्वप्न आणि स्वतःबाबत वचनबद्ध असला तर जगात सर्वाकाही शक्य आहे.”
मान्याला मिस इंडिया 2020 चा रनर-अप खिताब मिळाला
मानसा वाराणसीने मिस इंडिया 2020 चा खिताब जिंकाला आहे. ती तेलंगाणात इंजीनियर आहे. हरियाणाची मनिका श्योकंदला मिस ग्रँड इंडिया 2020 आणि मान्याला मिस इंडिया 2020 रनर-अप घोषित करण्यात आले आहे.