
स्थैर्य, दि.१५: लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी (LPG) घरगुती सिलिंडरच्या किमती दिल्लीत 50 रुपयांनी वाढल्या आहेत.
14.2 किलोग्रॅम एलपीजीच्या नव्या किमती दिल्लीमध्ये 769 रुपये असतील. या किमती राष्ट्रीय राजधानीमध्ये उद्या 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. फेब्रुवारीच्या महिन्यात दुसऱ्यांदा या किमती वाढल्या आहेत.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर्सच्या किमती 4 फेब्रुवारीपासून 25 रुपयांनी वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे, एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमती अशावेळी वाढल्या आहेत जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे भावसुद्धा आधीच गगनाला भिडलेले आहेत.
स्वयंपाकाचा एलपीजी गॅस क्रूड ऑईल आणि नैसर्गिक वायूपासून तयार होतो. आज सलग सहाव्या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेल 79.06 रुपयांनी विकतं आहे. मुंबईत पेट्रोल 95.21 रुपये तर डिझेल 86.04 रुपये प्रती लिटर झालं आहे. हा आजवरचा सर्वात जास्त दर आहे. कलकत्त्यामध्ये पेट्रोल 90.01 आणि डिझेल 82.65 वर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आज 90.96 रुपये तर डिझेल 84.16 रुपये इतकं झालं आहे.