स्थैर्य, फलटण । आज फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक यांचा वाढदिवस आहे. श्रीमंत रघुनाथराजे यांचा स्वभाव करारी आहे हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे. फलटण मध्ये येणारे सर्व अधिकारी हे श्रीमंत रघुनाथराजे यांना दबकूनच असतात. त्यांना माहीत आहे की रघुनाथराजेंकडे चूक चालत नाही. त्यांच्या पुढे खोटे बोललेले त्यांना खपत नाही. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबत जे कार्यकर्ते कार्यरत असतात ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते असतात. मला आताचा एक किस्सा आठवला, काही महिन्यांपूर्वी फलटण बसस्थानकाचे काम काही होत नव्हते, त्याला चालना मिळत नव्हती. त्या वेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही विद्यार्थ्यांनी श्रीमंत रघुनाथराजे यांच्याकडे त्या बाबत तक्रार केली त्या वेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील बसस्थानकाच्या व्यवस्थापकाला बोलावून प्रथम चौकशी केली त्या नंतर असे निदर्शनास आले की बसस्थानकाच्या नूतनीकरणाबाबत फलटण येथील अधिकाऱ्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्या नंतर रघुनाथराजेंनी सातारा येथील महामंडळाच्या सिव्हिल डिपार्टमेंट मधील मुख्य अधिकाऱ्यांना बोलावले त्यांच्या वेळे नुसार फलटण बाजार समिती येथे बैठक आयोजित केली परंतु त्या वेळी सातारा येथील महामंडळाच्या सिव्हिल डिपार्टमेंट मधील अधिकारी हे म्हसवड येथे गेले. फलटण बाजार समिती मध्ये रघुनाथराजे यांनी फलटण नगरपालिकेचे पदाधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ठेवले होते. ज्या वेळी फलटण येथील बसस्थानकाच्या डेपो मॅनेजरनी संमधीत अधिकाऱ्यांना फोन लावला त्या वेळी कळले की ते म्हसवड येथे गेलेले आहेत.
त्या नंतर श्रीमंत रघुनाथराजे यांनी त्या संमधीत अधिकार्यांना बजावले की, ते येथे आल्यावरच फलटण बसस्थानकाच्या डेपो मॅनेजर यांना बाजार समिती येथून बाहेर सोडणार नाही. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था बाजार समितीत करण्यात आली आहे. असा निरोप त्या संमधीत अधिकाऱ्यांना कळल्यावर एका तासाच्या आत ते अधिकारी बाजार समितीत हजर झाले व काही वर्षे रखडलेल्या बसस्थानकाच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाले.
परंतु आता करोनाच्या काळामध्ये सर्वच नेतेमंडळी आपापल्या घरी राहून नागरिकांना आवाहन करीत आहेत परंतु करोनासारख्या जीवघेण्या आजारपणातही श्रीमंत रघुनाथराजे हे फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात जावून नागरिकांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. तालुक्यातील युवा वर्ग जो पुण्यामुंबई मध्ये नोकरी, कामधंदा अथवा शिक्षणा साठी गेलेला आहे व आता करोना मुळे ते गावी परत आलेले आहेत. त्यांनी कशी काळजी घ्यावी. त्यांच्या घरच्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. जर कुणाला काही अडचण असेल कधीही मला माझ्या नंबर वर फोन करा. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हाधिकारी पर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा. यातून फलटण तालुक्यातील जनतेबद्दल श्रीमंत रघुनाथराजे यांना किती माया व आपुलकी आहे हे दिसून येत होते त्या सोबतच जर पुण्यामुंबई वरून आलेला कोणी काही ऐकत नसेल तरीही मला सांगा मी त्याला माझ्या भाषेत समजावून सांगतो असेही सांगून पुण्यामुंबई वरून आलेलेल्या विलीगिकरण करण्यास रघुनाथराजे प्रवृत्त करीत होते, असे व अनेक किस्से श्रीमंत रघुनाथराजे यांच्या बाबतचे आहेत. ते सगळे लिहणे आता तरी शक्य नाही.
आजच्या दिवसानिमित्त फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
– प्रसन्न दिलीप रूद्रभटे