श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेबांची कार्यपद्धती व आदर्श मार्गदर्शक : आ. दिपकराव चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे आदर्श आणि राज्य कारभार करताना सर्व सामान्य जनता, शेतकरी व अन्य समाज घटकांना न्याय देण्याची कार्यपद्धती स्विकारुन राजकारण व समाजकारणात गेली २५/३० वर्षे सक्रिय असलेल्या श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी नवे आदर्श निर्माण केल्यानेच त्यांना उज्वल यश आणि सर्वसामान्यांचा पाठिंबा लाभत असल्याचे नमूद करीत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज मुंबईत बाजार समिती पदाधिकारी व संचालकांचा होत असलेला सत्कार असल्याचे प्रतिपादन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले आहे.

नवभारत टाईम्स या राज्यातील विविध जिल्ह्यात, अनेक भाषांमध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या सभागृहात आयोजित सहकार परिषदेत आदर्श कारभार करणारी, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देवून केवळ शेतमाल विक्री नव्हे त्यांच्या सर्व प्रश्न, समस्यांची सोडवणूक आणि त्यांना कृषी विषयक मार्गदर्शन आणि आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करुन देणारी राज्यातील एक आदर्श बाजार समिती म्हणून राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खास पुरस्कार देवून विशेष सत्कार होत आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सन १९९५ मध्ये विधान सभेत पोहोचताच कृष्णा लवादानुसार उपलब्ध झालेले राज्याचे वाट्याचे ५९४ टी.एम.सी. पाणी ऑगस्ट २००० पर्यंत अडविले नाही तर राज्याचा त्यावरील हक्क जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्री मंडळात स्थान नको पण राज्यातील कायम दुष्काळी पट्टयातील ३५ तालुक्यांना कृष्णेचे पाणी द्या अशी मागणी तत्कालीन मनोहर जोशी सरकार समोर ठेवली, किंबहुना फलटण येथे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत आयोजित पाणी परिषदेत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करुन घेऊन राज्याच्या वाट्याचे संपूर्ण पाणी तर अडविलेच पण कायम दुष्काळी तालुक्यात कृष्णेचे पाणी पोहोचविले त्याचा परिणाम म्हणून फलटण तालुका लवकरच १००% बागायत होत असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कृष्णेचे पाणी पोहोचल्याने तालुका १०० % बागायत झाला तरी केवळ ऊसाचे क्षेत्र वाढून चालणार नाही, ऊसाबरोबर अन्य पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली पाहिजे, फळबागाखालील क्षेत्रात वाढ आणि फळ व अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी यासाठी प्रयत्नशील असताना श्रीराम व साखरवाडी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढ आणि उप पदार्थ निर्मितीला प्राधान्य यासाठीही श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांचे नेतृत्वाखाली सुरु असलेले प्रयत्न फलटण तालुका राज्यातील कृषी विकासातील एक आदर्श तालुका म्हणून नावारुपाला आणतील नव्हे ती प्रक्रिया कृषी व औद्योगिक विकास प्रक्रियेद्वारे अंतीम टप्प्यात असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

त्या पार्श्वभूमीवर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समितीचे कामकाज चालविताना तालुक्यात उत्पादित शेतमालाला अधिकचा दर, योग्य वजन, संपूर्ण पेमेंट लगेच, गरज असेल तर शेतमाल निर्यात व्यवस्था केली असल्याने तालुक्यातील शेतकरी बाजार समितीच्या कामकाजावर बेहद्द खुश असून प्रतिदिन शेतमालाची आवक वाढत असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

बाजार समिती म्हणजे शेतमालाची आवक उतरवून घेणे, त्याची योग्य दरात विक्री आणि शेतकऱ्याला वेळेवर योग्य पेमेंट हे सूत्र बदलवून बाजार समिती म्हणजे शेतकऱ्यांची मार्गदर्शक, गरज ओळखून योग्य मदत व सहकार करणारी, त्यांच्या सर्व समस्या निवारण करणारी संस्था असे बाजार समितीचे स्वरुप श्रीमंत रघुनाथराजे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीतून बदलले असताना बाजार समितीच्या प्रशासनाची योग्य साथ सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून लाभल्याने या तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाची स्थापना या बाजार समितीने केली असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती विषयक व जीवन विषयक प्रश्नांची सोडवणूक करताना वीज उपलब्धता, बियाणे, खते, कीटक नाशक औषधांची उपलब्धता, पाणंद व बांध रस्त्यांची समस्या, बांधांचे वाद व अन्य सर्व समस्यांचे निवारण अगदी खाजगी सावकारी किंवा बँकांची थकीत वसूली विषयक प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून करण्यात येत असल्याने शेतकरी आत्महत्या हा विषय सोडविणे किंवा तसा प्रसंग येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कोविड काळात शेतमालाच्या खरेदी विक्रीची व्यवस्था एकही दिवस खंड पडू न देता पुरवठा साखळी सुरु ठेवून, सुसज्ज कोविड उपचार केंद्र उभारुन एक वेगळा आदर्श फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने निर्माण केला आहे. मार्केट यार्ड येथे शेतमालाची आवक वाढविणेसाठी शेतकरी हितास्तव तसेच हमाल, मापाडी यांचे करिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करणे बरोबर शेतकरी व सर्वसामान्यांसाठी बाजार समितीच्या आवारात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत असून तेथे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांना उत्तम प्रकारची वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून या ३ मजली प्रशस्त इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारुन तेथे शेतकरी व सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंसह शेतीविषयक औजारे, खते, बी बियाणे, कीटक नाशक उपलब्ध होतील याची व्यवस्था करण्यात येत आहे, तसेच शासनाच्या पशू वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून बाजार समितीच्या आवारात सर्व अत्याधुनिक साधने, सुविधांनी सुसज्ज पशू वैद्यकीय दवाखाना उभारण्यात येत असून तेथे शेतकऱ्यांना जनावरांसाठी सर्व पशू वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कृषीदेव पेट्रोलियम योजनेद्वारे फलटण तालुक्यात पेट्रोल/डिझेल पुरवठ्यासाठी सुमारे १६ विविध ठिकाणच्या पेट्रोल पंप उभारणीद्वारे एकाच ठिकाणी पेट्रोल/डिझेल बरोबरच शेती औजारे, खते, बी बियाणे, कीटक नाशके आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्याची योजना साकारत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग व्यवसाय सुरु करण्याची एक चांगली संधी आपल्या भागात उपलब्ध होणार असल्याचे आ. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कृष्णेच्या पाण्याद्वारे तालुक्यात घडलेल्या दुसऱ्या हरित क्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेती मालासाठी अधिक सक्षम पणन व्यवस्था देऊन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक स्पर्धाक्षम व लोकाभिमुख केले बद्दल व एक आदर्श बाजार समिती म्हणून फलटण पॅटर्न म्हणून नावलौकिक वाढविलेबद्दल फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा सर्वत्र बोलबाला झाल्याचे निदर्शनास आणून देत आ. दिपकराव चव्हाण यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कुशल, अभ्यासू, सर्वसमावेशक नेतृत्वामुळे हे शक्य झाल्याचे नमूद करीत बाजार समितीच्या कामकाजबद्दल श्रीमंत रघुनाथराजे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!