दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी संधी मिळावी याकरिता कोळकी येथील युवा उद्योजक रूपेश नेरकर यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले.
फलटण पंचायत समितीचे सभापतीपद श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाले आहे. या पदावर युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. आपली ही मागणी पूर्ण होण्यासाठी रुपेश नेरकर यांनी थेट पुणे गाठून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले आहे. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ रासने उपस्थित होते.
आपल्या या मागणीबाबत बोलताना रुपेश नेरकर यांनी सांगितले की, ‘‘श्रीमंत विश्वजितराजे यांचे कार्य फलटण तालुक्यातील जनतेला माहीतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून फलटण तालुक्यातील जनतेची सेवा करत असताना मागील 2 वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोना चे संकट उभे होते. तेव्हा त्यांनी सुरुवातीपासून फलटण तालुक्यातील जनतेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना दौरा करून जनतेला मदत करुन आधार दिला. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशात जनतेसाठी कोरोना दौरा करणारे ते पहिले नेते असावेत. त्यांची कामाची पद्धत, धडाडी आम्हा कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना सभापतीपदी संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण व्हावी अशी मनोभावे प्रार्थना आपण श्री गणरायाच्या चरणी केली आहे.’’