स्थैर्य, मुंबई, दि. ३० : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि. ९-१० जानेवारी २०२१ रोजी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी ‘भाषणकला‘ या विषयावर दोन दिवसीय शिबिर (अनिवासी) आयोजित केले आहे. हे शिबिर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी खुले असून म्हाळगी प्रबोधिनीच्या मुंबई येथील चंचल स्मृती कार्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
भाषणकला ही सर्वच क्षेत्रात आज आवश्यक आहे, मात्र राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी ती अनिवार्य बाब आहे. या विषयाशी संबंधित विविध पैलूंची तोंड ओळख कार्यकर्त्यांना करून देण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच म्हाळगी प्रबोधिनीने हे शिबिर आयोजित केले आहे. यात संवाद कौशल्ये, उच्चार शास्त्र, वाचन व्यासंग, देहबोली इ. विषयांचा समावेश असेल.
आपणास विनंती आहे की या प्रशिक्षण शिबिराचे वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी करावे व आमचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश मर्यादित कार्यकर्त्यांसाठी असल्याने दि. ५ जानेवारी २०२१ पूर्वी आपले नाव पुढील दिलेल्या संपर्कावर नोंदवावे.
नोंदणी संपर्क:
अनिल पांचाळ ९९७५४१५९२२, दिलीप नवेले ९९६७४२९४५६