गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक श्रीमंत सत्यजीराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजाळे येथील सुजित आर. के. निंबाळकर यांनी श्रीमंत सत्यजितराजे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…..
महाराष्ट्रातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या फलटण संस्थानात, नाईक निंबाळकर राजघराण्याने अनेक शतके रयतेभीमुख राजकारभार केला आहे. या राजघराण्याचा वारसा श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीद्वारे औरंगवलेला आहे.
श्रीमंत सत्यजितराजे यांचा जन्म 29 जानेवारी 1992 रोजी झाला. त्यांचे पिताश्री श्रीमंत संजीवराजे आणि मातोश्री श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या संस्कारांचे ते बालपणापासूनच बाळकडू होते. श्रीमंत सत्यजितराजे यांनी सिम्बॉयसिस स्कूल, पुणे येथे शालेय शिक्षण घेतले, तर त्यांनी बी.एम.सी.सी. पुणे येथून बी.बी.ए. (आय.बी.) आणि लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्नल येथून एम.एस.सी. बिजनेस मॅनेजमेंट या पदव्या मिळवल्या.
24 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीमंत सत्यजितराजे आणि श्रीमंत मिथिलाराजे देसाई यांचा शुभविवाह संपन्न झाला. श्रीमंत सत्यजितराजे यांच्या कारकिर्दीची सुरुवात गोविंद मिल्क आणि गोविंद फाउंडेशन मार्फत झाली. श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी तालुक्यातील तरुण युवकांचे उत्तम संघटन बांधले आणि फलटण एज्युकेशन सोसायटी च्या संचालक पदी उत्तम कार्य केले.
आज, कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, नर्सिंग, कृषी व फार्मसी या विविध महाविद्यालयांमार्फत युवकांना आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाद्वारे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात, श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलन व मधोजी क्लब या मार्फत फलटणच्या क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत.
श्रीमंत संजीवराजे आणि श्रीमंत शिवांजलीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत सत्यजितराजे उद्योग क्षेत्रात अव्वल कार्य करत आहेत. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचा प्रकल्पामार्फत अनेक शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जीवनात धवलक्रांती करण्याची किमया साधली गेली आहे. या प्रकल्पामार्फत शेतकरी महिलांसाठी शेती पूर्व उद्योगाचे नवे दालन खुले झाले असून शेतकरी व विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या उद्योग समूहाचा यशोचित सन्मान म्हणून वसंतराव नाईक पुरस्कार आणि ‘इंडियन डेअरी असोसिएशन’ यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा पश्चिम विभागीय उत्कृष्ट डेअरी प्रकल्प –२०२४ हा मानाचा पुरस्कार दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते प्रदान करून दिला गेला आहे.
श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली विविध समाजपयोगी कामे श्रीमंत सत्यजितराजे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपलेली दिसते. श्रीमंत सत्यजितराजे विचार मंच, श्रीमंत सत्यजितराजे युवक प्रतिष्ठान तालुक्यात तसेच ग्रामीण भागात सामाजिक सांस्कृतिक कार्य करताना दिसून येत आहे. ते नेहमी आधुनिकता, नाविन्यनीता आणि संशोधन या बाबींचा समावेश व्हावायासाठी विविध देशातील विविध उपक्रमांना भेट देऊन तेथील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याची सुयोग अंमलबजावणी करण्यासाठी सतर्क व सज्ज असतात.
श्रीमंत सत्यजितराजे फुटबॉल उत्तम खेळतात आणि क्रिकेट ची आवड आहे. त्याचबरोबर ट्रेकिंग, जंगल सफारी छंदही जोपासण्याचा प्रयत्न करतात. ते युवा उद्योजक, युवा नेते, युवकांचे श्रद्धास्थान, आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.