
स्थैर्य, सातारा, दि. ३० : सध्या फलटण शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी रुग्ण संख्या वाढत चालली असताना एक गोष्ट अधोरेखित झाली असून खुद्द महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्थानिक पत्रकार यांचे समोर मांडला असून जी टीम किरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.त्याच महसूल यंत्रणेतील अधिकारी पर जिल्ह्यातुन येत आहेत ही बाब समोर आली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना कायद्याची व शासकीय नियमांची पायमल्ली खुद्द उपविभागीय (प्रांत) कार्यालयातील एक व तहसील कार्यालयातील दोन नायब तहसिलदार हे करीत असून तिन्ही नायब तहसिलदार हे अनेक दिवसापासून पुणे जिल्ह्यातून फलटण तालुक्यात येत आहेत.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फलटण उपविभागीय कार्यालय (प्रांत) नायब तहसीलदार विजय चांदगुडे व फलटण तहसीलदार कार्यालय येथील संजय गांधी कार्यालयातील नायब तहसीलदार एम.पी. जाधव, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे हे जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली करून पुणे जिल्ह्यातुन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात कामावर येत आहेत. पुणे व पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्याच्या बाहेरून येण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.त्याच बरोबर स्वतःच्या आरोग्याची तपासणी देखील करणे आवश्यक आहे असे असताना देखील दोन्ही कार्यालयातील तिन्ही नायब तहसीलदार अनेक दिवसांपासून विना परवानगी बेकायदेशीरपणे जिल्हा बंदी आदेशाची पायमल्ली करत दोन नायब तहसीलदार फलटण ते पुणे, पुणे ते फलटण तसेच फलटण ते बारामती, बारामती ते फलटण असा अनेक दिवसांपासून प्रवास करीत आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांचा जीव धोक्यात घालता आहेत सदर प्रकरणी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी संबंधित तिन्ही जबाबदार अधिकाऱ्यांचे मागील दिवसांचे मोबाईल लोकेशन तपासून दोन्ही अधिकाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे जिल्हास्थलांतरीत झाल्यानंतर आरोग्य तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. केवळ नायब तहसीलदार पदावर काम करत आहेत म्हणून नियम व कायदा धाब्यावर बसवून दोन्ही नायब तहसीलदार यांनी जनतेला व प्रशासनाला वेठीस धरले आहे. त्यामुळे त्यांचेवर नियमाप्रमाणे कारवाई करून त्यांना सक्तीने क्वारंटाईन करावे अशी मागणी केली जात आहे.