वाळु चोरी करणाऱ्या ट्रँक्टरवर महसुल विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड, दि.५ : माणगंगा नदीपात्रातुन विना परवाना वाळुची चोरटी वाहतुकीस करणाऱ्या ट्रँक्टरवर माणच्या तहसिलदार बाई माने यांनी कारवाई करीत ट्रँक्टर जप्त करीत मालकांवर लाखो रुपयांच्या दंडाची कारवाई केली.

माणगंगा नदी पात्रातील वाळू हि वाळू सम्राटांना सोन्यांचे अंडे देणारी कोंबडी वाटत असल्यानेच माणगंगेच्या वाळूला सोन्याच्या दर मिळत आहे त्यामुळे वाळू चोरटे विना परवाना अनाधिकृत  माणगंगा नदी पात्रातील वाळू दिवस रात्र लुटत आहेत याची खबर महसुल विभागाला समजताच महसुल विभागाने  माणगंगा नदीतुन वाळु चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असुन या कारवाईसाठी महसुल विभागाने भरारी पथकाची नियुक्ति केली असुन या पथकाकडुन वाळु तस्करांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे, महिन्याभरात या पथकाने तीन वेळा कारवाई करुन वाळु सम्राटांना दणका देत त्यांच्याकडुन लाखो रुपयाचा महसुल गोळा केला आहे. माणच्या तहसिलदार बाई माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कारवाई करीत असुन या पथकाच्या कारवाईने वाळु तस्करांचे कंबरडे मोडले आहे. माण तहसीलदार कार्यालयातील भरारी पथकाने वाळू चोरट्यांना सळो कि पळो करुन सोडले असुन भरारी पथकाच्या प्रमुख तहसीलदार बाई माने यांनी या महिन्यात तीसरी कारवाई करीत रविवारी रात्री ९ वाजता करुन १ लाख ३६ हजार रुपये दंडांची कारवाई वाळु तस्करावर केली आहे.

या बाबत म्हसवडचे तलाठी उत्तम आखडमल यांनी दिलेली माहिती या प्रमाणे रविवारी रात्री ९ वाजता माण तहसील मधील महसुल विभागाच्या  भरारी पथकाने म्हसवड येथील नदी पात्रालगत असलेल्या स्मशान भुमीच्या पाठीमागुन विना परवाना अनाधिकृत पणे नदी पात्रातील वाळू एका ट्रॅक्टर मध्ये भरुन निघालेला स्वराज कंपणीचा एम एच ११-यु-९६४४ हा ट्रॅक्टर हा भरारी पथकाला आढळुन आला त्या ट्रक्टर ला स्मशान भुमि समोर रोखले व ड्रायव्हर अजिनाथ कृष्णा घोडके राहणार म्हसवड, डावखरे वस्ती यास  ट्रॅक्टर सह ताब्यात घेऊन ट्रॅक्टर तलाठी कार्यालयात नेहण्यात येवून तहसीलदार बाई माने यांनी घोडके यांना १ लाख ३६ हजार दंड व रॉयलटी भरण्यास सांगण्यात आले हि कारवाई तहसीलदार बाई माने , तलाठी उत्तम आखडमल, किसन गुजर, तलाठी गणेश रसाळ, तलाठी परदेशी तलाठी बदडे आदी उपस्थीत होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!