सापडलेला 90 हजारांचा धनादेश केला परत, प्रामाणिक गॅरेज कामगाराचा पोलिसांतर्फे सत्कार


स्थैर्य,सातारा, दि.२१: गोडोली नाका परिसरात रस्त्यात सही असलेला 90 हजारांचा चेक गॅरेज कामगार असणार्‍या किरण भोसले यांना सापडला. त्यांनी तो प्रामाणिकपणे नजिकच्या गोडोली पोलिस चौकीत जमा केला. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा पोलिसांनी सत्कार केला.

याबाबत माहिती अशी, ओमकार दत्तात्रय मोहिते यांचे जनता सहकारी बँकेत या करंट खाते आहे. या खात्यातून त्यांनी 90 हजारांचा धनादेश बनवला होता. त्यावर सहीदेखील केली होती. हा धनादेश सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोडोली चौक ते पोवई नाका डांबरी रस्त्यावर गहाळ झाला. दरम्यान, या रस्त्यावर पडलेला हा धनादेश गॅरेजमध्ये काम करणार्‍या किरण रामचंद्र भोसले यांना सापडला. त्यांनी हा धनादेश नजिकच्या गोडोली पोलिस ठाण्यात दिला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गोडोली पोलिस चौकीत पोलिस उपनिरीक्षक एस. एच. रोकडे व इतर पोलिस कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांचा सतकार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!