ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । राज्य शासनाच्या दि. 30 डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार  संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह. यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 0जानेवारी २०२२ रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे   आदेश पारित केले आहेत.

विवाह व विवाहाच्या अनुषांगिक सोहळयांचे बाबतीत, विवाह व त्या अनुषांगिक सोहळे बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, त्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम, बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, याबाबतीत उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

अंत्यसंस्काराच्या बाबतीत, जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

जिल्हयातील पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने अथवा जास्त गर्दी होणारी ठिकाणे तसेच लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे याबाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे, या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या दि.24 डिसेंबर २०२१ अन्वये आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करु शकतात.

या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे  या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या व अंमलात असलेल्या  प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील .

CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!