मौजे वरोशी व रायघर गावठाण क्षेत्र प्रतिबंधित


जकातवाडी क्षेत्रामध्ये सुक्ष्म प्रतिबंध आदेश जारी

स्थैर्य, सातारा दि. 20 : जावली तालुक्यातील मौजे वरोशी व सातारा तालुक्यातील मौजे जकातवाडी  व रायघर (आंबळे) क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. जिल्ह्यातील तीन गावांच्या क्षेत्रात  खालीलप्रमाणे पुढील आदेशाप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी घोषित केले आहेत.

जावली तालुक्यातील मौजे वरोशी येथील संपूर्ण गावठाण. सातारा तालुक्यातील मौजे जकातवाडी येथील मुख्य रस्ता, पूर्वेला- शेतजमीन अनिल कांबळे यांचे क्षेत्र, पश्चिमेला रंजना संपत यादव यांचे घर, उत्तर- सावंत कॉलनी स्टॉप, दक्षिण-शिवाजी पुतळा. व मौजे रायघर संपूर्ण गावठाण. ही क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहे.

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा तसेच वाई यांचेकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!