मौजे धनवडेवाडी, मौजे शाहूपुरी व मौजे शेंद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील प्रतिबंधित क्षेत्र शिथिल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.14 : सातारा तालुक्यातील मौजे धनवडेवाडी, मौजे शाहूपुरी व मोजे शेंद्रे  ग्रामपंचायत हद्दीमधील येथील रहिवासी असणारा एक कोरानो व्हायरस संक्रमीत रुग्ण आढळले होते.  रुग्ण वास्तव्यास असणा-या विलगीकरण सेंटर पॉईंट केंद्रस्थानी धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती तथा तहसिलदार सातारा, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती,  सातारा यांच्याकडील अहवालानुसार उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर, सातारा  मिनाज मुल्ला यांनी सातारा तालुक्यातील मौजे धनवडेवाडी, मौजे शाहूपुरी व मोजे शेंद्रे  या गावामधील  प्रतिबंधित क्षेत्र उठविणे, शिथिल, निरस्त करण्याबाबतचा आदेश पारीत केला आहे. तथापि निरस्त, शिथिल, प्रतिबंधित क्षेत्राबाबत  म्हणजेच जे सामान्य क्षेत्राबाबत जिल्हादंडाधिकारी, सातारा यांच्याकडील 31 मे 2020 अनव्ये तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोना (कोवीड-19) बाबतचे आदेश व दिशानिर्देश असतील ते सर्व त्यांचेवर बंधनकारक राहतील


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!