
स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा :औंध येथील श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त फाऊंडेशनच्यावतीने राजयोग आयोजित करण्यात आलेल्या औंध हिल मॅरेथॉन स्पर्धेला जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सुमारे 600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, अमर देशमुख, योगेश – फडतरे, अनिल जाधव, हणमंतराव शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. ही स्पर्धा तीन वयोगटांत घेण्यात आली. 18 ते 34 वयोगट (पुरुष): किशोर नारायण शिंदे यांनी 38.58 सेकंदांत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे ऋषिकेश सपकाळ वयशवंत हिरवे यांनी मिळवला. महिला गटात प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे आकांक्षा शेलार, शितल सपकाळ व प्रज्ञा पाटोळे यांनी पटकावले.
35 ते 49 वयोगट (पुरुष): प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे मल्लिकार्जुन परदे, पवन प्रजापती व श्रीनिवास पांडे यांनी मिळवले. महिला गटात स्मिता शिंदे, दिपाली किर्दत व पूनम दिघे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. 50 वर्षांवरील वयोगट (पुरुष): रमेश चिवीलकर, रवींद्र जगदाळे व पांडुरंग पाटील यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. महिला गटात अनिता पाटील, संगीता उबाळे व साधना धनावडे यांनी यश संपादन केले. या स्पर्धेबरोबरच 3 कि.मी. फन मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आलेहोते. या स्पर्धेत बालगोपाळ, हौशी युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारितोषिक वितरण गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, यसदीबाबा, डॅनी सर, योगेश फडतरे, संदीप मांडवे, हणमंतराव शिंदे, अमर देशमुख, सौ. सविता देशमुख, शुभम शिंदे, अनिल जाधव, सपोनि गणेश वाघमोडे, प्रशांत खैरमोडे, नवल थोरात, संजय निकम, सुधाकर कुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे सुयोग्य नियोजन हर्षद देशमुख, बाबाराजे नांदुगडे, तानाजी इंगळे, शंभूराजे देशमुख, प्रशांत जाधव, सचिन चव्हाण, पृथ्वीराज देशमुख, प्रमोद कोळी, बापू आमले, सुरज देशमुख, प्रशांत इंगळे, प्रणव वसव, आशिष देशमुख, अनिकेत देशमुख यांनी केले.
