भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । सातारा । देशाने नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला.गेल्या सात दशकांमध्ये भारत विकासाच्या यशशिखरावर पोहचला आहे.जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरू आहे.पंरतु,या विकासमार्गात भ्रष्टाचार आणि हरवत चाललेला बंधुभाव मोठा अडथळा ठरत आहेत,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले. देशातील सर्व दुराव्यवस्थेचे मुळे हे भ्रष्टाचारात आहे.वरुन खालपर्यंत भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे.अशात देशाच्या विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त भारताचा संकल्प प्रत्येक देशवासियांनी करावा, आवाहन पाटील यांनी केले.

भ्रष्टाचारासह हरवत चाललेला बंधुभाव ही देखील मोठी समस्या देशासमोर आवासून उभी आहे. ग्रामपंचायतीपर्यंत ही समस्या पोहचली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांच्या विरोधात राजकारण केले जाते, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात.त्यांचे अर्थकारण संपवण्याचा प्रयत्न केला जातो.हे आता बंद झाले पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.मोठ्या उत्साहात दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिवस,स्वातंत्र दिन साजरा करतो.पंरतु, देशाचे सामर्थ जगाला दाखवत असतांना अंतर्गत बंधुभाव एकोपा वाढीस लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.

देशवासियांनी एकमेकांसोबत प्रेमाने वागले पाहिजे.एकत्रित प्रयत्नातूनच देश विकास करेल.देशाला आतून बळकट करणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिधींनी देखील भ्रष्टाचार मुक्तीसाठी सदैव प्रयत्नरत रहावे.सत्ताधार्यांनी विरोधकांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून केली जाणारी कुरघोडी बंद करावी. सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अशा तंपास यंत्रणाचा वापर विरोधकांचे राजकारण संपवण्यासाठी हत्यार म्हणून करू नये.


Back to top button
Don`t copy text!