दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
भारतीय जनता पार्टीकडून पक्षाला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने भाजपाविरोधात ठराव करण्यात आले. आरपीआय आठवले गटाची आज फलटणमध्ये सभा संपन्न झाली, या सभेत हे ठराव करण्यात आले. या सभेला आरपीआयचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू मारूडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरपीआयच्या झालेल्या सभेत पुढील ठराव करण्यात आले –
- भाजपाने आम्हाला सन्मानाची वागणूक आजपर्यंत दिलेली नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल.
- भाजपा किंवा महायुतीच्या कार्यक्रमादरम्यान आठवलेसाहेब यांचा फोटो किंवा झेंडे लागले पाहिजेत.
- आरपीआयची दुसरी सभा माढा मतदारसंघातील मध्यवर्ती ठिकाणी घेतली जाईल.
या सभेला माढा लोकसभा मतदारसंघातील आरपीआय आठवले गटाचे सुनील भालेराव (त्रिमली, औंध), एन. के. साळवे (नातेपुते), सतीश वाघमारे, सुनील भोसले, राजेंद्र जगताप (वडूज), कुणाल गडांकुश (वडूज), युवराज वाघमारे (नातेपुते), दयानंद धाईंजे (माळशिरस), हेमंत दोरके (वाठार स्टेशन), धनाजी पवार (माळशिरस), बादल सोरटे (नातेपुते), दत्ता पाटील (खुडूस), मधुकर काकडे, मुन्ना शेख, विजय येवले, राजू मारूडा, नितीन अहिवळे, अमित काकडे, अजित बनसोडे, किशोर अहिवळे, प्रवीण काकडे, राजेंद्र काकडे, दीपक अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, सतीश अहिवळे, तेजस काकडे, प्रवीण शेळके, विमलताई काकडे, राखी कांबळे, सारिका अहिवळे, वंदना यादव, माया अहिवळे, मीना काकडे, आशा काकडे हे कार्यकर्ते उपस्थित होते.