‘त्या’ प्रवर्गाचा उमेदवारच नसेल तर आरक्षण बदलून मिळते: रामराजेंचा स्टेटस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,फलटण, दि.३० : सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत झाल्यानंतर त्या प्रवर्गाचा उमेदवारच गावात नसेल तर काळजी करु नका. आरक्षण बदलून मिळते फक्त तहसीलदारांकडे अर्ज करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या धामधुमीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काल शुक्रवार (दि. २९) रोजी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी व्हॉटसऍप या सोशल नेटवर्किंग अप्लिकेशनचा आधार घेतला आहे.

ना. श्रीमंत रामराजे यांनी व्हॉटसऍपवर, “ज्या गावात सरपंचपदाचे आरक्षण पडले असेल परंतू उमेदवार मिळत नसतील तर तहसीलदार यांचे कडे अर्ज करा. आरक्षण बदलून मिळेल. काळजी नसावी.” असा स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.

सध्याच्या आधुनिक युगात नेते व कार्यकर्ते यांच्या हातात तंत्रज्ञान  आल्याने सहजगरित्या एकमेकांना हवे ते निरोप अथवा आपले मार्गदर्शन पाठवू शकतात, याचेच हे उत्तम उदाहरण असेल.


Back to top button
Don`t copy text!