स्थैर्य, दि.८: औषधनिर्माणषास्त्र शाखेतील उच्च ज्ञान घेताना संशोधनत्मकतेची कास विद्याथ्र्यानी धरावी असे मत गौरीशंकरचे जनसपंर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यानी व्यक्त केले. ते गौरीशंकर इन्स्टिटयूट आॅफ फार्मस्युटिकल ऐज्युकेषन अॅन्ड रिसर्च सेंटर लिंब येथे आयोजित एम फार्मसी विद्याथ्र्याच्या स्वागत समारंभात बोलत होते. यावेळी उपप्राचार्य योंगेश गुरव डाॅ राहुल जाधव डाॅ सतोश बेल्हेकर प्रा धैर्यशील घाडगे प्रा माधुरी मोहीते रजिस्ट्रार निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले जन्मापासून ते मूत्यूपर्यत औषधाचा संबध येतो. बदलत्या काळानुसार बदलणारे आजार व त्याचे स्वरुप यावर यापुढील काळात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. एम फार्मसीच्या विद्याथ्र्याकडून समाजाच्या मोठया अपेक्षा आहेत त्यानी नोकरी व्यवसाय पेक्षा संषोधनाकडे अधिक लक्ष दयावे.
यावेळी उपप्राचार्य योगेश गुरव म्हणाले औषधनिर्माण क्षेत्रात यापुढील काळात मोठी संधी आहे. हे क्षेत्र अधिक प्रगत व प्रगल्भ होत आहे. विद्याथ्र्याना या क्षेत्रात नविण्यपूर्ण काम करण्यास खूप वाव आहे, नजीकच्या काळात संपूर्ण जगात भारतीय फार्मसिस्टना मोठी मागणी असणार आहे, यासाठी विद्याथ्र्यानी या क्षेत्रातील ज्ञानाबरोबर कैशल्य वाढीसाठी प्रयत्न करावेत.
प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक प्रा.धैर्यशील घाडगे प्रा.सवित्री पोळ रजिस्ट्रार निलेश पाटील यांनी विद्याथ्र्याना शैक्षणिक कामकाजाची माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ निलम पवार हिने केले आभार प्रा.राहुल जाधव यांनी मानले.