सरडे गावच्या हद्दीत १३ जर्सी गाईंची सुटका; अनोळखी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
सरडे (ता. फलटण) गावच्या हद्दीतून दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजता जर्शी जातीच्या गाई ट्रकमधून कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या घेऊन जात असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी पोलिसांनी ८ लाख रुपयांचा एक आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.१२ सी.टी. ०६९०) जप्त करून ४ लाख ३४ हजारांच्या १३ जर्सी गाईंची सुटका केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रांगट अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!