कराड तालुक्यातील तुळसण व केसे येथील 2 महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 स्थैर्य, सातारा दि. 6 : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून  मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.

211 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला

वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!