दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । मुंबई । वाशिम जिल्ह्यातील खापरदरी ते सावरगाव कान्होबा येथील नादुरूस्त रस्ता विशेष दुरूस्ती अंतर्गत निधी उपलब्ध करून त्याचे काम प्राधान्याने करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत राजेंद्र पाटणी यांनी खापरदरी ते सावरगाव कान्होबा येथील नादुरूस्त रस्त्याचे आणि पुलाचे बांधकाम करणेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री गिरीष महाजन बोलत होते. यावेळी सदस्य राजेश टोपे यांनी सहभाग नोंदविला.
श्री. महाजन म्हणाले, सावरगाव ते खापरदरी हा ग्रामीण रस्ता ४.२० किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याची व पुलाची दुरूस्ती करणे आवश्यक असून, विशेष बाब म्हणून दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याची व पुलाची दुरूस्ती करण्यात येईल. राज्यातील अत्यंत खराब रस्ते प्रथम या प्राधान्यक्रमाने रस्ता दुरूस्ती करण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिली.