स्थैर्य, दि.४: यूएन म्हणजेच संयुक्त
राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे.
यूएनमध्ये मतदानानंतर गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले
आहे.
जागतिक आरोग्य
संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ
आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळले आहे. यासाठी झालेल्या
मतदानात 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी
समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले होते. विशेष म्हणजे
भारताने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान
केले. तर, चीन,पाकिस्तान आणि रशियासारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केले.
या निर्णयानंतर गांजापासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय
गांजाच्या सायंटिफिक रिसर्चसाठीही उपयोग होऊ शकतो.