आर.टी.ओ.ने फलटण आगारात लावलेली वाहने हटवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
आर. टी. ओ. विभागाने फलटण आगारात लावलेली जप्त वाहने इतरत्र हलविण्याची आवश्यकता आहे.

बेकायदेशीर प्रवासी व माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करताना आर. टी. ओ. अधिकारी सदर वाहने ताब्यात घेऊन एस. टी. आगारात लावतात. सदर वाहने दीर्घकाळ किंबहुना काही वाहने कायमची येथेच पडून राहतात. त्याबदल्यात एस. टी. ला प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमानुसार भाडे दिले जाते, हे खरे आहे. तथापि, फलटण आगारात एस. टी. ची वाहने (बसेस) लावण्यास पुरेशी जागा नसताना ही जप्त वाहनांची मोठी अडचण होत असल्याने त्याबाबत आर. टी. ओ. च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरित निर्णय घेऊन फलटण आगारातील सदर वाहने इतरत्र हलवावीत किंवा वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून या वाहनांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.


Back to top button
Don`t copy text!