दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । लोणंद । लोणंद रेल्वे जंक्शनच्या शासकीय जागेवर झालेली अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याबाबत समक्ष भेटून चर्चा करण्यासाठीची मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे संपदा अधिकाऱ्यांनी येथील २०० ते २५० नागरिकांना नोटीस बजावल्याने या वस्त्यांतील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत . दरम्यान, अतिक्रमणे काढून घेण्याबाबत आणखी सहा महिन्यांचा कालावधी रेल्वे प्रशासनाने वाढवून द्यावा , अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
लोणंद रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाल्यापासून येथे रेल्वेची कामे वेगात सुरू आहेत . मध्य वे विस्तारणीकरणाचे रेल्वेच्या टू कामही वेगात सुरू आहे . पुणे- मिरज- कोल्हापूर या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या विजेवर सुरू करण्यात येत आहेत . त्याची चाचणीही नुकतीच पूर्ण झाली आहे . लोणंद- फलटण या रेल्वे मार्गाची चाचणी झाली असून , हा मार्गावरही रेल्वेगाडी धावू लागली आहे. अन्य विस्तारणीकरणाची कामेही वेगात सुरू आहेत.
लोणंद रेल्वे जंक्शनच्या हद्दीतील रेल्वेच्या शासकीय जागेत अनेक वर्षांपासून झोपड्या टाकून शेकडो कुटुंबे राहात आहेत. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या बाबासाहेब उत्तरेकडील डॉ. आंबेडकर वस्तीतील ९ ० ते १०० झोपड्या रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कारवाई करून या झोपड्या हटविल्या आहेत. त्याठिकाणी विजेचे मोठे सबस्टेशन उभारून इमारतीही बांधल्या आहेत. मात्र, दक्षिण बाजूकडील डोंबरवस्ती, सौदेवाले, रंगारी वस्ती व वडार वस्ती येथील अतिक्रमणे हटविण्याचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या संपदा अधिकाऱ्यांनी जारी केलेले नोटीस या वस्त्यांतील नागरिकांच्या दोन दिवसांपूर्वीच हाती पडली आहे . त्यामध्ये ता . १४ मार्चला दुपारी ३ वाजता विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( वर्क्स ) पुणे यांच्या कार्यालयात वैयक्तिक सुनावणीसाठी सक्षम प्रतिनिधींसमवेत उपस्थित राहण्याबाबत कळवले आहे . या नोटिशीमुळे या वस्त्यांतील नागरिकांत खळबळ उडाली आहे . दुसऱ्या जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमणे काढून घेण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी रेल्वे प्रशासनाने वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे . या बाबत लोणंद येथील राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले असून आमदार मकरंद पाटील यांनी या विषय वर कायमचा तोडगा काढण्याची आमची भूमिका आहे असे सांगून या वर लवकरच प्रशासनाबरोबर बैठक घेऊ असे अश्वासन दिले आहे.
रेल्वे प्रशासनाने सहा महिने द्यावेत : जाधव लोणंद येथील रेल्वे केबिन येथील गट नंबर ४२३ व रेल्वे गेट येथील गट नंबर ४२७ येथे शासनाने रेल्वे विस्थापितांना शासकीय जागेचा ताबा दिला आहे . मोजणी व नकाशेही तयार केले आहेत . त्या प्रक्रियेतील काही त्रुटी दूर करण्यासाठी व अतिक्रमणे काढून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा . डोंबरवस्ती , सौदेवाले , रंगारी वस्ती व वडारवस्ती येथील २०० ते २५० रेल्वे विस्थापितांना जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती जिल्हा वडार समाज संघटनेचे उपाध्यक्ष नाना शंकर जाधव यांनी दिली .