दैनिक स्थैर्य | दि. 29 मे 2024 | कोळकी | अनाधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, टॉवर छतावरील जाहिरात उभारणी केलेली आहे. राज्यात यामुळे अपघात होवून जीवीत हानी झालेली आहे. त्या अनुषंगाने गावातील सर्व होर्डिंग, फ्लेक्स, टॉवर, छतावरील जाहिरात फलक काढून टाकणेची कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत काढून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल; असे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. सी. साळुंखे यांनी केले आहे.
दैनिक स्थैर्यने नुकताच याबाबत आवाज उठवला होता. त्यावर कोळकी ग्रामपंचायतीने कठोर पावले उचलत होर्डिंग, फ्लेक्स, टॉवर, छतावरील जाहिरात फलक आता सदरची उभारणी करताना ज्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली असेल व मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल देणाऱ्या संस्था / व्यक्ती यांचा अहवाल ग्रामपंचायतीस ३ दिवसात सादर न केलेस आपले होर्डिंग / प्लेक्स / बोर्ड / छतावरील जाहिरात ग्रामपंचायत काढून घेईल व त्यासाठी येणारा खर्च वसूल करण्यात येईल; असेही ग्रामविकास अधिकारी आर. सी. साळुंखे यांनी जाहीर केले आहे.