धार्मिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनी पायाभूत सोयी सुविधाच्या अनुदानासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । सातारा । जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा,कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत  पात्र शाळांची  शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यात येणार आहे.

तरी संबंधित इच्छुक  शैक्षणिक संस्थांनी  दि. 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  अर्ज सादर करावेत.


Back to top button
Don`t copy text!