बाजार समितीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; शेतकऱ्यांच्या तक्रारींवर रघुनाथराजेंची क्विक ऍक्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | फायनान्स कंपनी व कृषि सेवा केंद्र यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट जमा न करता फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याबाबतीत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाने योग्य ती दखल कारवाई करण्याची भूमिका घेतल्यानंतर सर्व संबंधित कृषि सेवा केंद्रानी नोटीशीमध्ये नमूद असलेली जास्तीची रक्कम, त्यावरील दंड आणि व्याज सबंधित फायनान्स कंपनीकडे तात्काळ जमा केले असल्याची माहिती समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केअर इंडिया फिनवेस्ट लि. फरिदाबाद, हरियाणा व फलटण तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राचे डिलर्स यांचे माध्यमातुन उधारी, निविष्ठा खरेदी विक्रीचे लक्षांक पुर्ण करणे, शेतकऱ्यांची संमती न घेता ऑनलाईन कर्जपुरवठा करणे या सर्व बाबींबद्दल फलटण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. याबाबत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने फलटण तालुक्यातील सर्व डिलर्स, पंचायत समितीचा गुण नियंत्रण विभाग व तालुका कृषि अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सहायक निबंधक, सह,संस्था, फलटण, तक्रारदार शेतकरी, फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलाविणेचे निर्देश दिले होते.

शेतकऱ्यांचे म्हणणे व कृषि सेवा केंद्राचे डिलर यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर आणि शेतक-यांना आलेल्या सिटी सिव्हील अँड सेशन कोर्ट मुंबई-३२ च्या नोटीसाची खातरजमा केलेअंती शेतकऱ्यांची खुप मोठ्या प्रमाणावर फसवणुक झाली असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुक झाली असुन याबाबतीत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाने योग्य ती दखल घेत फायनान्स कंपनी व कृषि सेवा केंद्र यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे पेमेंट जमा न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजताच सर्व संबंधित कृषि सेवा केंद्रानी नोटीशीमध्ये नमूद असलेली जास्तीची रक्कम, त्यावरील दंड आणि व्याज सबंधित फायनान्स कंपनीकडे तात्काळ जमा केले असल्याची माहिती समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून वेळोवेळी प्राप्त तक्रारीवर दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम फलटण बाजार समिती करीत असल्याचे मार्केट कमिटीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!