दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
वेदांत श्री प्रकाशन पुणे प्रकाशित, श्री. शिवाजीराव घोरपडे गजेंद्रगडकर लिखित ‘धोबी पछाड’ या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि. २ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास प्रसिध्द साहित्यिक श्री. बबन पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य श्री. रवींद्र बेडकिहाळ, प्रसिध्द लेखिका व समाज शास्त्रज्ञ डॉ. अश्विनी शंभूसिंग घोरपडे-गजेंद्रगडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सत्यजित घोरपडे व सौ. धनश्री घोरपडे यांनी केले आहे.