स्थैर्य, सातारा, दि.२५: जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना भेटण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी पोलिसाकडून पास मिळणार आहे. हा पास असेल तरच रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्णालयात जाता येणार आहे. अन्यथा विनापास रस्त्यावर दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
नातेवाईकास देण्यात आलेल्या पासची वैधता रुग्न औषधोपचाराकरीता शासकिय रुग्नालयात कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुदतीकरीता देण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीकडे पास परवाना असेल त्यांचेवर कारवाई होणार नाही . परंतू ज्या व्यक्ती विनाकारण, विना परवाना फिरताना आढळून येतील त्यांचेवर पोलीस कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे अवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले आहे.