कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात मज्जाव; प्रवेश दिल्यास रुग्णासहित हॉस्पिटल प्रशासनावर सुद्धा कडक कारवाई करणार : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०४ : सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी असणाऱ्या सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक राजरोजपणे फिरताना आढळून येत आहेत. तेथूनच कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचे समोर येत आहे. या साठो कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना बाधित रुग्णांना आता ह्या पुढे भेटता येणार नाही. जर कोरोनाबाधित रुग्ण हा गंभीर असेल तर आणि तरच फक्त एका नातेवाईकाला त्याच्या साबाबत राहण्याची परवानगी राहणार आहे, असे आदेश फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिलेले आहेत. आज फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहामध्ये फलटण शहरातील सर्व हॉस्पिटल प्रशाशन व डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या वेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अश्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिलेल्या आहेत. आगामी काळामध्ये कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक जर रुग्णासोबत आढळून आले तर रुग्णासहित हॉस्पिटल प्रशासनावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोनाचा अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर कोरोनाबाधिता समवेत त्या रुग्णांचे नातेवाईक सुद्धा वावरताना फलटणमधील हॉस्पिटल मध्ये दिसून येत आहे. व तेथूनच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच हॉस्पिटल प्रशासनाने जबाबदारी घेऊन कोरोना रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना तेथे येण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!