स्थैर्य, सातारा, दि.२५: पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली असून गेली दोन वर्षे आम्ही या मतदारसंघात काम करत असून पदवीधर विकास महामंडळ स्थापण करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल. चारही पक्षांकडून यापुर्वी अनेक वेळा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पडीक उमेदवारांना नाकारत पदवीधरांनी इतिहास घडविण्याचे आवाहन डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषेदेत केले.
यावेळी संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, चंद्रकांत पाटील तसेच इतर पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत डॉ. कोकाटे हे उमेदवार असुन त्या प्रचारासाठी ते आज सातारा दौऱ्यावर आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन
कोकाटे म्हणाले, पदवीधर विरुध्द साखर कारखानदार असा मुकाबला पुणे विभागात होत आहे. ज्या कारखानदारांनी काटा मारत खिसे भरले त्यांनाच प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली आहे. काटा मारणाऱ्या या उमेदवारांचा काटा पदवीधर काढतील, असा मला विश्वास असल्याचेही कोकाटे म्हणाले. त्यांच्यानंतर प्रवीणदादा पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना व भाजपाच्या कार्यपध्दतीवर टिका करत कोकाटे यांच्या विजयाचा दावा केला.
वाई आगारातील वाहकाचा कोरोनाने घेतला बळीमुंबईहुन ड्युटी करून आल्यानंतर त्यांना त्रास होत होता