स्थैर्य, फलटण, दि. ०५ : सध्या फलटणमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनाला लढा देण्यासाठी सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण हा एकमेव पर्याय सर्वांना दिसत आहे. शासनाच्या नियमानुसार फलटण शहरासह तालुक्यातील १८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. फलटण मधील नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीसाठी फलटण संवाद अंतर्गत राजे गटाच्या वतीने नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबत फलटणमधील चारही सेंटरसाठी विशेष अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी लसीकरण केंद्र व तेथील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज – 9403821292, 7588149328, 99755921653, 7588124463
मुधोजी महाविद्यालय – 7588060007, 9665485244, 9421963704, 9423614583
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय (शेती शाळा) – 9975493940, 9881031852, 9970839961, 9975377936
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लीश मिडीयम स्कूल (जाधववाडी) – 9960386061, 9503491870, 9420633009, 9970989726
ज्या नागरिकांना आपल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर द्वारे नोंदणी करायचे आहे त्यांनी https://www.cowin.gov.in/home येथे जावून सुध्दा नोंदणी करू शकतात.