वन विभागाकडील रस्ते व इतर कामांबाबत डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला आढावा


दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । सांगली । वन विभागातील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आढावा घेन प्रस्तावित कामांबाबत संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी आज येथे  दिल्या.

वन विभागाकडील रस्ते व अन्य प्रलंबित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटीलआमदार गोपीचंद पडळकरआमदार मानसिंगराव नाईकजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीकोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एच. एस. पद्मनाभा, उपवनसंरक्षक निता कट्टे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादवयांच्यासह वन व सार्वजनिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यांबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. प्रस्तावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता संबंधित विभागांनी कटाक्षाने घ्यावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी. वन विभागाने त्यांच्या जागेतून जाणारे रस्ते व होणाऱ्या विकास कामांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवावाअशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत दिल्या.


Back to top button
Don`t copy text!