
स्थैर्य, 19 जानेवारी, सातारा – आंबटगोड चव असणारी आणि लहानांपासून वयोवृद्धांनाही भुरळ पाडणारी अशी ही लालचूटूक महाबळेश्वरची खासियत असणारी स्ट्रॉबेरी फळे मोठ्या प्रमाणात सध्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात यंदाच्या हंगामात प्रथमच येऊ लागली आहेत. सध्या नवीन हंगामाची सुरुवात असल्यामुळे दर तेजीत असून साडेतीनशे ते चारशे रुपये किलो दराने ही स्ट्रॉबेरी सातारकर मोठ्या आनंदाने खरेदी करत आहेत .मार्च आणि एप्रिल दरम्यान या फळांची मोठ्या प्रमाणात आवक आणि उत्पादन होऊन हे दर अगदी शंभर रुपये प्रति किलो पर्यंत खाली येत असतात. राजवाडा परिसरात टिपलेले हे दृश्य. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)
