तहसील कार्यालयातील अभिलेख लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि.२४: फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले .

महेश्वर नारायण बडेकर ( अभिलेख कक्षापाल ( रेकॉर्ड किपर ) , तहसील कार्यालय कराड , वर्ग 3 , रा . शिवशक्ती निवास , शास्त्रीनगर , रिमांड होमच्या पाठीमागे , मलकापूर ) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी , तक्रारदार यांनी फेरफार उतारा नकल हवा होता . त्यासाठी अभिलेख कक्षापाल महेश्वर बडेकर याने तक्रारदार यांच्याकडे 800 रूपये लाचेची मागणी केली होती . सोमवारी बडेकर याने तक्रारदार यांचेकडून 500 रूपये स्विकारले होते . उरलेले रक्कम मंगळवार दि . 23 फेब्रुवारी रोजी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बडेकर यांना रंगेहात पकडले . सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के , पोलीस नाईक विनोद राजे , पोलीस हवालदार संभाजी काटकर , निलेश येवले यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!