दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण तालुक्यातील मुस्लिम बांधवांसाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातुन फलटण येथील उर्दू शाळेमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. तरी फलटण तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आपल्या पाल्याचे प्रवेश उर्दू शाळेमध्ये घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून पहिली ते बारावीचे उर्दू शाळेमध्ये सर्व वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाल्याबद्दल उर्दू शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इम्रान कुरेशी, हाजी शकूर कुरेशी, हाजी नियाज अहमद कुरेशी, सलीम शेख (वस्ताद), हाजी सलीम कुरेशी, महंमद रफिक शेख, हाफिज मेहबूब सय्यद, हाफीज सलीम, सैफ शेख, जमीर शेख, मुक्तार कुरेशी, तालीफ कुरेशी, मुहम्मद कुरेशी, सलाम कुरेशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.