दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा सर्व ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी मठाचीवाडी गावच्या सरपंच सौ. जयश्री भोसले, उपसरपंच काकासो कदम, ग्रामसेवक वी. एल. ढोबळे, तलाठी एस. एम. पंडित, कृषी सहाय्यक बोडके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, अध्यक्ष उमेश शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या समृद्धी मोहिते, पूजा मारवाडी, समृद्धी कुंजीर, प्राजक्ता ननावरे, साक्षी शिंदे, शिवांजली धुमाळ, हर्षदा लोखंडे व समृद्धी उल्हारे यांनी मठाचीवाडी येथील शेतकर्यांचे अनुभव जाणून घेतले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषी कन्या शेतकर्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.